spot_img
अहमदनगरशहरात बत्ती गूल; नगरकरांचे अनोखे आंदोलन, शिवसेना, राष्ट्रवादीने दिला 'हा' इशारा

शहरात बत्ती गूल; नगरकरांचे अनोखे आंदोलन, शिवसेना, राष्ट्रवादीने दिला ‘हा’ इशारा

spot_img

शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन ः संपत बारस्कर
अहमदनगर / नगर सह्याद्री :
शहरात कित्येक दिवसांपासून शहर व उपनगरामध्ये ग्राहकांना पुर्व कल्पना न देता वारंवार वीज पुरवठा खंडीत केली जात आहे. थोड्या फार वादळी वारे सुटले तरीही शहरातील बत्ती गुल होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळा तोंडावर आला असल्याने मान्सून पूर्व तयारी करावी. नागरिकांचे फोन उचलावेत. नागरिकांना वेठीस धरण्याचे काम होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले. शहरातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा ईशारा राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, प्रकाश भागानगरे, अभिजित खोसे, केतन क्षीरसागर, जॉय लोखंडे, सुरेश बनसोडे, साहेबान जहागीरदार, साधना बोरुडे, शैला गिरे, रेणुका पुंड, रूपाली गायकवाड, किरण कटारिया, तुका कोतकर, सोनू घेमुड, माऊली जाधव, मंगेश खताळ, संजय सपकाळ, ऋषिकेश ताठे, पप्पू पाटील, दीपक खेडकर, मळू गाडळकर, अंकुश मोहिते आदि उपस्थित होते.

यावेळी विद्युत विभागाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत राहील याकरीता सर्वतोपरी योग्य ते नियोजन व उपयोजना करण्यात येतील. तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व तक्रार निवारण केंद्रातील फोन वेळेत घेतले जातील. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत संबंधितांना सुचना करण्यात येतील व फोन न उचलल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अहिल्यानगर शहर व उपनगरातील संबंधीत उपविभाग कार्यालय व कक्ष कार्यालय येथील तक्रार निवारण केंद्रातील दुरध्वनी क्रमांक देण्यात येतील. यावेळी सावेडी व नालेगाव येथील कक्ष कार्यालयातील फोन न उचलणा-यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल व सर्व लाईनवरील झाडे तोडण्याचे काम करण्यात येऊन ते उचलण्यात येतील. उघड्या डीपीचे दरवाजे आठ दिवसाचे आत बंद करण्यात येतील. असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

विज पुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन : भगवान फुलसौंदर

अहमदनगर शहरातील वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला. याप्रसंगी याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, अशोक दहिफळे, संदिप दातरंगे, जेम्स आल्हाट, गौरव ढोणे, जालिंदर वाघ, गिरिधर हांडे, संजय आव्हाड, अरुण झेंडे, दिनेश लाड, मुन्ना भिंगारदिवे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक-दोन महिन्यांपासून नगर शहरात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीजे अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. वीजेची झालेली दरवाढ आणि वेळेवरही लाईट बील भरुनही नागरिकांना व व्यापार्‍यांना योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही. परिणामी इर्न्व्हटर, जनरेटचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे नाहक खर्च वाढत आहे. वीज प्रवाह अचानक कमी-जास्त होत असल्याने इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बिघडत  आहेत.

थोडे वादळ व पावसाचे वातावरण तयार झाले की लाईट चार-चार तास तर कधी-कधी रात्रभर येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागते आहे. वीज वितरण कार्यालयात फोन लावला तरी  फोन उचलत नाही आणि उचललाच तर व्यवस्थीत उत्तरे देत नाही. तरी ही वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विज वितरण कंपनीकडून भारनियमन जाहीर झालेले नाही तरीही दिवसभरातून अनेकवेळा लाईट घालविली जाते. त्यामुळे नागरिक, व्यापारी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लाईट नसल्याने पाण्याच्या टाक्या भरणे अवघड होते. अचानक कमी-जास्त विज पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे बिघडण्याची प्रमाणही वाढले आहे. सध्याचे वादळ-वारा, पाऊसाचे दिवस असल्याने याचे नियोजन करणे गरजे आहे, परंतु विज वितरण कंपनीचे लक्ष नसल्याने नागरिकांना नहाक त्रास होत आहे. यात तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे फुलसौंदर म्हणाले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...