तरुणाई म्हणते, ‘प्राजक्त तनपुरेंना धडा शिकवणे हीच स्व. शिवाजीराव गाडे यांना खरी श्रद्धांजली’
राहुरी | नगर सह्याद्री
तरुण, उच्च शिक्षीत आणि उमेदीचा असल्याने मागील पाच वर्षापूर्वी आम्ही वेगळा निर्णय घेतला आणि प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभे राहिलो. आमची कामे मार्गी लागतील आणि तरुणांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात आमचा भ्रमनिरास झाला. आमच्या परिसरातील तरुणाईला ढाबे- हॉटेलांवर नेऊन व्यवसाधिन करण्यात आले. यासाठी त्यांनी काही खास पंटर ठेवले. त्यातूनच आमच्या भागाचे नेते शिवाजीराव गाडे यांच्या कुटुंबाला झळ बसली असा आरोप केला गेला. गाडे यांच्या कुटंबाबाबतची सुडभावना कायम कायम ठेवली आणि त्यातूनच तरुणांना व्यवसनाधिन करण्याचे षडयंत्र रचले गेले. गाडे यांच्या कुटुंबावर अशी वेळ आणली जात असेल तर उद्या त्यांच्याकडून आमच्या कुटुंबातील तरुणांना देखील याच पद्धतीने देशोधडीला लावले जाऊ शकते. त्यामुळे आता बारागाव नांदूर परिसरातील अबालवृद्धांसह तरुणाईने पाच वर्षापूर्वीची चूक दुरुस्त करण्याचा आणि प्राजक्त तनपुरे यांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसर हा स्व. शिवाजीराव गाडे यांचा बालेकिल्ला! याच बालेकिल्ल्यातून गाडे यांनी मुळा-प्रवरा वीज संस्थेचे कामकाज चालविले. त्यांना माननारा मोठा वर्ग राहुरी तालुक्यात आजही कायम आहे. स्व. गाडे यांनी विधानसभेला नशिब अजमावून पाहिले. मात्र, नशिबाने त्यांना साथ दिली नाही. शिवाजीराव गाडे यांच्यामुळे आपली विधानसभेची संधी हुकल्याची भावना प्रसाद तनपुरे यांच्या कुटुंबात राहिली आणि ती आजही कायम आहे. गाडे यांनी तनपुरे यांचा कोणताही मुलाहीजा आणि दबाव न बाळगता स्वतंत्र विचाराचे राजकारण केले. त्यामुळेच त्यांची स्वतंत्र ओळख राहिली. स्व. गाडे यांच्यानंतर त्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्यांच्या मुलाने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. मात्र, शिवाजीराव गाडे यांच्यानंतर त्यांचा मुलगा भविष्यात आपली डोकेदुखी ठरु शकतो अशी भिती राहुरीतील प्रस्थापितांना वाटू लागली. त्यानंतर या मुलाचा सकाळ- संध्याकाळ ‘ढाबा बंदोबस्त’ सुरु झाला. त्यातून आज या कुटुंबासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बारागाव नांदूर परिसरात नक्की परिस्थिती काय आहे याचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न केला असता विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात मोठी नाराजी आणि संताप व्यक्त होत होता. विशेषत: माता- भगिनी आणि तरुणांमधून जास्तच संताप व्यक्त होत होता. विकासाचे कोणतेही भरीव काम न करता या भागातील तरुणांना आणि स्थानिक प्रश्नांना प्राजक्त तनपुरे यांनी कायम दुर्लक्ष केले. तरुणांच्या हाताला काम देण्यापेक्षा त्या तरुणांना भलत्या मार्गाला लावण्याचे काम त्यांनी केल्याच्या प्रतिक्रीया मिळाल्या.
तरुणांची घोर निराशा करणार्या प्राजक्त तनपुरे यांना धडा शिकविण्याचा निर्धार युवक कार्यकर्त्यांसह शिक्षीत तरुणांनी व्यक्त केला. पाच वर्षापूर्वी आमच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या अपेक्षांबाबत आमचा भ्रमनिरास झाला असल्याने आता आम्ही तनपुरे यांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वाडा संस्कृतीत अत्यंत गुर्मीत राहणार्या प्राजक्त तनपुरे यांना धडा शिकविण्याचा आणि आमच्या परिसराचे हित जपणार्या, तरुणाईचे प्रश्न समजून घेणार्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार बारागाव नांदूरमधील तरुणांनी व्यक्त केला.