नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दुबईत तुफान पाऊस झाला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाने दुबईचे वाळवंट जलमय झालंय. रस्ते, चौक आणि दुकाने तुडुंब भरली आहेत, त्यामुळे दुबईचे लोक खूप चिंतेत आहेत. शेजारील ओमानमध्येही पावसाने असा कहर केला की पुरात १८ जणांना जीव गमवावा लागला. पावसामुळे आलेल्या पुराचा सर्वात वाईट परिणाम दुबईच्या रस्त्यांवर झाला असून त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
विमानतळ, मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते, व्यापारी संस्थांमध्ये पुराचे पाणी शिरले. शाळा बंद होत्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 24 तासात 160 मिमी पाऊस झाला. जे सहसा दोन वर्षांत होते. ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.
दुबई विमानतळावरही पूर आला असून त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी खराब हवामानाबाबत सार्वजनिक सुरक्षा सल्लाही जारी केला होता, लोकांना खराब हवामानाबद्दल सतर्क करण्यात आले होते. UAE हवामान खात्याने अबुधाबीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुढील २४ तास मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.