spot_img
अहमदनगरबापरे! पोलिसास भर रस्त्यात मारहाण, कुठे घडला प्रकार पहा

बापरे! पोलिसास भर रस्त्यात मारहाण, कुठे घडला प्रकार पहा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
सरकारी कर्तव्य बजावित असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ, मारहाण करून भर रस्त्यात त्यांच्याशी गैरवर्तन केले. भिंगारवाला चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर व्दारकाधीश लस्सी दुकानाच्या जवळ गुरूवारी (दि. १८) सायंकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी पीडित महिला पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश सखाराम घोलप (वय ५२ रा. नांगरे गल्ली, नगर) याच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा, विनयभंग, शिवीगाळ, मारहाण कलमानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला पोलीस अंमलदार नगर शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्या गुरूवारी सायंकाळी भिंगारवाला चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर व्दारकाधीश लस्सी दुकानाजवळ सरकारी कर्तव्य बजावित असताना तेथे आलेल्या प्रकाश घोलप याने त्यांना शिवीगाळ करून हुज्जत घातली.

फिर्यादीला हात धरून चापटीने मारहाण केली. त्या करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून भर रस्त्यावर त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिला पोलीस अंमलदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक कोकाटे करत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय; ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार, पण… , कोर्ट काय म्हणाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील...

तपोवन परिसरातील बिबट्या जेरबंद; पहाटे चार वाजता पिंजऱ्यात अडकला

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर शहराजवळील तपोवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या...

मामा भांजे कर्मचारी, फौज तो तेरी सारी है,..; सुजय विखे पाटीलांनी ऐन थंडीत संगमनेरचे राजकीय वातावरण गरम केले.

सुजय विखे पाटीलांचा बाळासाहेब थोरांतसह सत्यजित तांबेंवर थेट हल्ला संगमनेर । नगर सहयाद्री:- मामा भांजे...