spot_img
अहमदनगरराष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलला, 'या' बड्या नेत्याला मिळाली संधी...

राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलला, ‘या’ बड्या नेत्याला मिळाली संधी…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नाहाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले असून नाहाटा यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला दिले होते. त्यानंतर अजित पवार गटाकडून पदाधिकार्‍यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पारनेरचे माजी सभापती, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची नियुक्ती प्रदेश कार्यकारिणीवर करण्यात आली आहे.

गायकवाड यांच्या जागी राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी काढले असून हे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. नियुक्ती पत्र देताना आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, कपिल पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. नाहाटा यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...