अयोध्या / नगर सह्याद्री : अयोध्येतील राम मंदिरात आज (दि.२२) प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे.
तसेच, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश- विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. संपूर्ण देशात हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. अगदी खेडोपाड्यात देखील मंदिरांमध्ये हा उत्सव मोठा प्रमाणात साजरा केला जाणार आहे. जिल्हाभर हा उत्साह आहे.