spot_img
ब्रेकिंग'अवकाळी' चा पुन्हा तडाखा! पालक मंत्र्यांसमोर बळीराजा ढसाढसा रडला..

‘अवकाळी’ चा पुन्हा तडाखा! पालक मंत्र्यांसमोर बळीराजा ढसाढसा रडला..

spot_img

सरसकट पंचनामे व मदत करण्याचे आदेश | गांजीभोयरे, सांगवी सूर्या, वडूले भागात पाहणी

पारनेर | नगर सह्याद्री

तालुक्यातील गांजीभोयरे, सांगवी सुर्या, वडूले, पानोली, जवळा, निघोज आदी गावांत गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकर्‍यांना शासनाच्या मदतीचा लाभ होण्यासाठी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर दौर्‍यात दिले. मंत्री विखे यांच्या या दौर्‍यात काही ठिकाणी गारपीटग्रस्तांच्या अश्रुंचा बांध फुटला. हे पाहून वातावरण भावनिक झाले.

मंत्री विखे यांनी रविवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील आपत्तीचा केंद्र बिंदू असलेल्या वडूले, सांगवी सूर्या, पानोली व गांजीभोयरे या गावांना भेटी दिल्या. नुकसानीची पाहणी करून गारपीटग्रस्तांशी संवाद साधत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मंत्री विखे म्हणाले, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे चारा पिके मातीमोल झाली असून काही भागांत चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन चारा उपलब्ध करून देईल.

नुकसानभरपाईची मर्यादा शासनाने ३ हेक्टरपर्यंत निश्चित केली असून तीन हेक्टर क्षेत्राला भरपाई देण्यात येईल. मागच्या काळच्या आपत्तीप्रसंगी एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या) निकाषापेक्षाही अधिक भरपाई देण्यात आली होती. दरम्यान वडूले येथे विखे फाउंडेशनच्या वतीने विखे यांच्या हस्ते शेतकर्‍यांना चारा वाटप करण्यात आले.

मंत्री विखे म्हणाले, पंचनामे प्राप्त झाल्यानंतर सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल. कोणावरही अन्याय होणार नाही. पावसामुळे काही भागात नुकसान झाले असले तरी काही भागात फायदाही झाला. शिवाजी खणसे यांच्या शेतात कांद्याची पाहणी करीत असताना अक्काबाई खणसे यांनी आपल्या भावना मांडल्या.

गारपीटीमुळे कांदा सडून जाणार आहे. आमच्या हाती काय येणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गारपीट सुरू झाली त्यावेळी आम्ही शेतातच होतो. गारपीटीत गारठलो गेलो. जवळची भांडीही उडून गेल्याचे त्या म्हणाल्या. अचानक गारपीट सुरू झाल्यावर मोकळया शेतामध्ये काय करणार? असे सांगत सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे असल्याची ग्वाही विखे यांनी दिली.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. ज्ञानदेव पठारे यांचे अलिकडेच निधन झाले. वडूले दौर्‍यादरम्यान मंत्री विखे यांनी पठारे मळयात जाउन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते, भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, वसंत चेडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, सचिन वराळ, बाबासाहेब खिलारी, सुनील थोरात, नगरसेवक अशोक चेडे नगरसेवक युवराज पठारे, बाळासाहेब पठारे, सागर मैड, मनोज मुंगसे, पंकज कारखिले, संजय मते, दिनेश बाबर, दादाभाऊ वारे, बाळासाहेब पठारे, दत्ता पवार, संदीप सालके, शिवाजी भापकर, किरण कोकाटे आदी उपस्थित होते

शेतकरी चारा चारा करत आहेत

चार दिवस झाले, शेतकरी जनावरांसाठी चारा चारा करीत आहेत. दोन दिवस शेतकरी पारनेरला जाऊन बसले. मात्र महसूल प्रशासनाकडून चार्‍याची पेंढीही मिळाली नाही. पारनेरच्या तहसिल कार्यालयाकडून सहकार्य मिळत नाही. चारा नाही, पाणी नाही फक्त आमचे निवेदन पुढे पाठविण्यासाठी ते पोष्टमनचे काम करीत आहेत. वर कळविले जाईल इतकेच उत्तर दिले जाते. गारपीटीत जनावरांना जखमा झाल्या आहेत. तरीही आम्ही त्यातून सावरत आहोत. शासनाने शेतकर्‍यांच्या भावनांची कदर करावी. नुकसानीची तिव्रता वडूले गावात तिव्र असल्याने तेथील वातावरणही गंभीर होते. चार दिवसांत चार्‍याची एकही पेंढी मिळाली नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर विखे यांनी जिल्हाधिकारी सालीमठ, जिल्हा कृषी अधिकारी तुंबारे यांना शेतकर्‍यांची हेळसांड होऊ देऊ नका, लवकरात लवकर चारा उपलब्ध होईल याची काळजी घ्या, असे सांगितले.
– बापूसाहेब भापकर. माजी सभापती बाजार समिती.

पपई उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

पपईच्या फळबागेला फळबाग विमा लागू होत नाही. या भागात अनेक पपई बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्या भरपाईसाठी शासनाच्या भूमिकेबाबत विचारले असता विखे म्हणाले, त्या संदर्भात अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. सुरूवातीस पंचनामे होऊ द्या, कागद हाती आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. सरकार हे शेतकर्‍याच्याच हिताचा निर्णय घेणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...