spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग: संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ला? कुठे घडला प्रकार

ब्रेकिंग: संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ला? कुठे घडला प्रकार

spot_img

मनमाड। नगर सह्याद्री
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या गाडीवर तरुणांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वृत्त: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी गुरुवारी नाशिकच्या येवला तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्रीउशिरा ते कारने मनमाड मार्गे धुळ्याकडे निघाले असतांना त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. संभाजी भिडे मुर्दाबादच्या अशा घोषणा देत तरुणांनी त्यांची गाडी अडवली.

यावेळी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी आक्रमक झालेल्या काहींनी थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आणि गाडी अडवणाऱ्यांना बाजूला केले. त्यानंतर संभाजी भिडे धुळ्याकडे रवाना झाले. भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना...

नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून...

जेऊर टोलनाक्यावर राडा; पाठलाग करून तरुणावर सपासप वार

राळेगणसिद्धीच्या तिघांवर गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर...

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...