spot_img
महाराष्ट्रAtal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल...

Atal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल ७९ हजार.. अटल सेतूचे वैशिष्टये पाहून चक्रवाल

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात अटल सेतू आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेतूमुळे दोन ते अडीच तासांचा प्रवास २० मिनिटात होणार आहे. परंतु यासाठी टोलही तेवढाच जास्त असणार आहे. कार साठी सिंगल टोल हा २५० रुपये आहे.

* अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये –
देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहण्याचा अंदाज

* टोलची चर्चा
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे. कार साठी सिंगल टोल हा 250 रुपये आहे. तर, कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपये तर, मासिक पास काढायला असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...

गुड न्यूज! 13 मे पर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

मुंबई | नगर सह्याद्री मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार...