spot_img
अहमदनगरमामीचे बाळासह अपहरण करण्याची धमकी देत भाचीवर अत्याचार

मामीचे बाळासह अपहरण करण्याची धमकी देत भाचीवर अत्याचार

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
मामीचे बाळासह अपहरण करण्याची धमकी देत अल्पवयीन भाचीवर युवकाने अत्याचार केल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात घडली. पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी (10 सप्टेंबर) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्‍वर डाडर (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या मामाकडे राहते. ती 30 ऑगस्ट रोजी दुपारी घरी एकटीच असताना ईश्‍वर तेथे आला. त्याने तिच्या कडे शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. फिर्यादीने त्याला नकार दिला असता त्याने ‘तुझी मामी एकटीच बाळाला घेवून गेली आहे. तु जर मला तुझ्या सोबत शारिरीक संबंध करू दिले नाही तर मी माझ्या मित्राला सांगून तुझ्या मामीला कीडनॅप करू शकतो’ अशी धमकी दिली.

त्याने त्याच वेळी फिर्यादीचे तोंड बंद करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यासंदर्भात फिर्यादीने तिच्या मामाला सांगितले असता 5 सप्टेंबर रोजी ईश्‍वरने फिर्यादीला तिच्या विद्यालयात गाठले व मामाला सांगितल्यावरून ‘आता बघ मी तुझ्या मामीचे काय करतो ते’ अशी धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या पीडिताने झालेला सर्व प्रकार तिच्या मामा -मामीला सांगितला. मामासह मंगळवारी रात्री कोतवाली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरून ईश्‍वर डाडर विरोधात अत्याचार, पोक्सो कमलानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...