spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, 'या' गावात खळबळ, नेमकं प्रकरण...

Ahmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, ‘या’ गावात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

spot_img

राहाता। नगर सहयाद्री-

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात एकच खळबळ उडाली आहे. दोन कटूंबावर जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी छापेमारी करत धरपकड सुरू केली असता शेकडो ग्रामस्थ गाव सोडून परागंदा झाले आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारात राहणाऱ्या दोन दलित कुटुंबांना ४०० ते ५०० जणांच्या जमावाने मारहाण करत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले होते.

याप्रकरणी गावातील ७१ जणांविरुद्ध ‘अ‍ॅट्रासिटी’सह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला तीन दिवस होऊनही आरोपीना अटक न झाल्याने याबद्दल सर्वत्र निषेध सुरू झालेला होता.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु करताच निर्मळ पिंप्री गावातून शेकडो ग्रामस्थ परागंदा झाले असून याप्रकरणी तीन आरोपींनाअटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...