spot_img
अहमदनगरसुजय विखे मेलेल्या आईचं दूध पिलेला नाही जशेस तसे उत्तर देईल; शालिनी...

सुजय विखे मेलेल्या आईचं दूध पिलेला नाही जशेस तसे उत्तर देईल; शालिनी विखे आक्रमक

spot_img

राहता | नगर सह्याद्री:-
भाजप नेते सुजय विखे यांच्या मंचावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी वसंतराव देशमुख यांनी खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. अशातच सुजय यांच्या मातोश्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. पण सुजय विखे मेलेल्या आईचं दूध पिलेला नाही जशेस तसे उत्तर देईल, असं शालिनीताई विखे म्हणाल्या.

चांगलं काम काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे विघ्न आणण्याचे काम ठराविक मंडळी करत आहेत. वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो, असं शालिनी विखे म्हणाल्या. सुजय विखे यांची सर्व भाषणं मुद्देसूद असतात, मी आई म्हणून ऐकत असते. आपल्या मुलाच्या तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये असे संस्कार आम्ही दिलेले आहेत. डोक्यावर पडला म्हणून आरोप करतात, परंतु कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नसतं.

आपण भाषण करताना काय तारतम्य बाळगलेलं आहे याचा विचार सुद्धा केला पाहिजे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील तर सुजय विखे मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशास तसं उत्तर देईल. आपण कुणीही बांगड्या भरलेल्या नाही. ठोशास ठोशा देण्याचं कर्तव्य आपलं आहे, असंही शालिनी विखे म्हणाल्या. खालच्या पातळीवर आपण कोणीही जाता कामा नये.

.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...

सबसे हटके गौतमी पाटील झटके! ‘टीप टीप बरसा पाणी’ वर स्विमिंग पूलमध्ये डान्स, पहा व्हायरल व्हिडीओ..

मुंबई | नगर सहयाद्री लोकप्रिय लावणी कलाकार आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील पुन्हा...

नगर शहरातील ‘तो’ लाईव्ह देखावा आकर्षक; तुम्ही पाहिलात का? वाचा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनेश्वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त...