spot_img
अहमदनगरBreaking : नगरमधील एमआयडीसीसाठी वडगाव गुप्ता येथील जमीन मिळणार, खा. विखे यांनी...

Breaking : नगरमधील एमआयडीसीसाठी वडगाव गुप्ता येथील जमीन मिळणार, खा. विखे यांनी दिली ‘ही’महत्वाची माहिती

spot_img

अहमदनगर|नगर सहयाद्री-
तरूणांना रोजगार उपलब्धतेसाठी वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरीता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीसाठी शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रीमंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता.

मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत नगर तालुयातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील ६०० एकर म्हणजेच सुमारे २२५ हेटर आर जमीन फेज २ साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे, ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खासगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार आवश्यक आहे. विस्तारासाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे होते. राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासासाठी वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील, असा विश्वास खा. डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी खासदार डॉ. विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...