spot_img
ब्रेकिंग"बिश्नोई समाजाची माफी मागा"; सलमान खानला ‘या’ नेत्याचा सल्ला? कारण सांगितलं..

“बिश्नोई समाजाची माफी मागा”; सलमान खानला ‘या’ नेत्याचा सल्ला? कारण सांगितलं..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचं नाव समोर येत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा सल्ला दिला आहे.

विशेष म्हणजे लॉरेन्स गँग सलमानलाही धमक्या देत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात टोळीतील काही जणांना अटकही करण्यात आली होती.भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी लिहिलं आहे की, “‘प्रिय सलमान खान, ज्या काळ्या हरणाची बिश्नोई समाज देवता म्हणून पूजा करतो, तुम्ही त्याची शिकार केली आणि ते शिजवून खाल्लं.

त्यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, बिष्णोई समाजात दीर्घकाळापासून याबद्दल नाराजी आहे. माणूस चुका करतो. तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशातील असंख्य लोक तुमच्यावर प्रेम करतात. माझा तुम्हाला सल्ला आहे की, तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करा आणि तुमच्या चुकीबद्दल बिष्णोई समाजाची माफी मागावी.” असे म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...