अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी सावेडी येथील आणखी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. अविनाश प्रभाकर वैकर (रा.रासने नगर सावेडी अहमदनगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणाचा तपास शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अमोल भारती यांनी आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली असून, त्यांच्या पथकाने सवेडी उपनगरातील आणखी एकाला अटक केली. या प्रकरणातील इतर आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.
या प्रकरणातील यापूर्वी अटक केलेल्या आरोपींचा जामीन अर्जावर येत्या सहा मार्च रोजी सुनावणी होणार आहे. तसेच दुसरा आरोपी सीए विजय मर्दा याची लोकाउट नोटीस पोलिसांनी जारी केली असून, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक भारतीयांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक निसार शेख, मोरे, सुयोग सुपेकर, महेश मगर, हेमंत खंडागळे, सोनाली भागवत, योगेश घोडके, मुकेश क्षिरसागर आदींच्या पथकाने केली.