spot_img
अहमदनगरAhmednagar News: ‘जय श्रीराम’ म्हणत अण्णांनी स्वीकारली साखर!! खा. विखे यांच्या 'या'...

Ahmednagar News: ‘जय श्रीराम’ म्हणत अण्णांनी स्वीकारली साखर!! खा. विखे यांच्या ‘या’ आठवणींना दिला उजाळा

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
खा. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा. विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान करत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ शिदा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या निमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी साजरा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने आपण खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिदा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा. विखे यांनी अण्णांना दिली.

किटमध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आहे. अण्णांना हे किट प्रदान करण्यात आले. ‘अण्णा मी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा, यासाठी साखर-डाळ शिदा भेट देत आहे. आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात. त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे, असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा. विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत, याची उत्सुकतेने पाहणी केली.

या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले. तसेच खा. सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी काशिनाथ दाते, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...