spot_img
ब्रेकिंग‘देवदूत’च ठरला राक्षस; उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

‘देवदूत’च ठरला राक्षस; उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

spot_img

Crime News Today: शहरातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.6) पहाटे घडली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बारावीत शिकणारी सोळा वर्षीय पीडित तरुणी नवीन नगर रोड येथील एका रुग्णालयात 4 एप्रिलपासून उपचार घेत होती. दरम्यान, रविवारी पहाटे डॉ. कर्पे याने तिची विचारपूस करत रुग्णालयाच्या गच्चीवर नेले. तेथे तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार करत धमकी दिली. या धक्कादायक प्रकाराची माहिती पीडित तरुणीने आपल्या कुटुंबियांना दिली.

त्यानंतर पीडितेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन डॉ. अमोल कर्पे याच्यावर अत्याचारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फराहनाज पटेल या करत आहे. दरम्यान, घटनेनंतर पसार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने वैद्यकीय वर्तुळासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...