spot_img
अहमदनगरएकुलत्या एक मुलाचे केले 'अवयव दान', दु:खातही पारनेरच्या 'नाईक' कटुबांने दिले चार...

एकुलत्या एक मुलाचे केले ‘अवयव दान’, दु:खातही पारनेरच्या ‘नाईक’ कटुबांने दिले चार जनांना ‘जीवदान’

spot_img

सुपा । नगर सहयाद्री-
एकुलता एक मुलगा अपघातात गेल्याचे दुःख आय़ुष्यभर विसरता येण्यासारखे नाही. मात्र अपघात झाल्यानंतर मुलगा ब्रेन डेड झाला हे समजताच त्यांच्या वडिलांनी थोडा सामाजिक विचार करूण त्याच्या दोन्ही किडणी, हृदय तसेच फुप्फुस या चारही अवयवांचे दान करूण चार जनांचा जीव वाचविण्याचे समाधान मिळविले आहे.

संजय नाईक यांचा मुलगा महेश (वय २० ) याचा नगर ते वाळकी रस्त्यावर वाळकी नजीक अपघात झाला. या अपघातात महेश गंभीर जखमी झाला होता. त्यास प्रथम नगर येथे खाजगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. मात्र येथे उपचार होणार नाहीत असे सांगीतल्यावर त्यास पुढील उपचारासाठी पुणे येथील रूबी हॉस्पीटल मधे दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी महेश च्या मेंदूस मार लागल्याने तो ब्रेन डेड झाला आहे.

त्यामुळे तो आता वाचणार नाही असे सांगीतले एकुलता एक मुलगा अन तोही अता आपणास सोडून जात आहे. याचे मोठे दुःख वडील संजय व आई आशाबाई यांना झाले होते. त्याच वेळी त्यांना अवयव दानाची संकल्पने बाबत माहितीमिळाली.वडील संजय हे मुंबई येथे शिक्षक आहेत. त्यांना पुर्वी पासून समाजसेवेची आवड आहे.

माझा मुलगा तर वाचणार नाही मग किमान त्याचे अवयव दान करूण इतरांना जीवदान मिळत असले तर ते आपण का करू नये असा विचार मनात आला आणि त्यांनी अवय दानाचा निर्णय घेतला. त्यांनी महेश याचे हृदय, फुप्पुस तसेच दोन्ही किडणी दान केल्या त्या चारही अवयवांचे लगेचच इतर रूग्णावर रोपण करूण चार जनांना जीवदान देण्याचे काम केले. त्यांच्या या धाडसाचे तसेच दानशूरपणाचे तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.

चार जनांना मिळाले जीवदान
माझा एकुलता एक मुलगा गेला हे दुःख आयुष्यभर विसरता येणार नाही. मात्र त्याच्या अवयव दानामुळे चार जणांना जिवदान मिळाले याचे समाधान कधीही न विसरता येण्यासारखे आहे. माझा मुलगा केवळ मेंदू सारख्या मानवी अवयवामुळे आम्हाला सोडून गेला अशी वेळ कुणावरही येऊ नये. अद्याप तरी विज्ञानाने मानवी अवयव तयार करण्याचे ज्ञान मिळविले नाही. त्यामुळे माझ्यातील माणूस जागा झाला व मी मुलाचे अवयव दान करण्यास राजी झालो.
– संजय नाईक, ( मुलाचे वडील, रूईछत्रपती, ता. पारनेर)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘आंदोलनाला परवानगी कशी दिली?’ हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, न्यालयात काय घडलं?

Manoj Jarange Patil: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील...

आंदोलनावर तोडगा न निघाल्यास…; पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..

पारनेर | नगर सह्याद्री मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते...

सीएसएमटी स्थानकात आंदोलकांचा गोंधळ!, लोकल अडवली, पुढे नेमकं काय घडलं?

रुळावर उतरून लोकल अडवली | चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र मुंबई | नगर सह्याद्री मराठा आरक्षणाचा मुद्दा...

मनोज जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल; सावेडीकरांची गर्जना, सरकारला दिला इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकासह...