spot_img
अहमदनगरप्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; 'त्या' घाटात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; ‘त्या’ घाटात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
कल्याण निर्मळ राष्ट्रीय मार्गावरील करंजी घाटातील माणिकशहा पिरबाबा दर्गा जवळील धोकादायक वळणावर रविवारी एका वीस फूट खोल दरीत अंदाजे 35 वर्षांच्या अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

करंजी घाटात एक पुरुषाचा मृतदेह बेवारसपणे पडलेला असल्याची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस उपधीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक लिमकर, जगदीश मुलगीर, विलास जाधव आणि करंजी पोलीस चौकीचे हवालदार दळवी, कुसळकर, बेरड, बुचकूल यांच्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी एक वाजता मृतदेह खोल दरीतून वर काढण्यात आला. या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. हा घातपाताचा प्रकार आहे की नाही, याची तपासणी पोलीस करत आहेत. या प्रकरणासंदर्भात पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. करंजी घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही...

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...