spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: श्रीरामपूरच्या अमोलवर केडगावात सपासप वार! कारण काय?

Ahmednagar Crime: श्रीरामपूरच्या अमोलवर केडगावात सपासप वार! कारण काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
श्रीरामपूरच्या तरूणाच्या डोक्यात तलवारीने वार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरातील केडगाव परिसरात घडला. याप्रकरणी जखमी अमोल अर्जुन आठरे (वय वर्ष 40, रा अतिथी कॉलनी श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून धीरज वाघ (रा. अतिथी कॉलनी, वार्ड नंबर ३, श्रीरामपूर) व त्याचा भाऊ (नाव, पत्ता नाही) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: फिर्यादी चारचाकी वाहनातून केडगाव येथून श्रीरामपूर येथे जात असताना रंगोली हॉटेलच्यापुढे पेट्रोल पंपाजवळ धीरजच्या भावाने त्यांचे वाहन थांबविले. अमोल यांनी वाहन थांबवून खाली उतरले असता धीरज तेथे आला व त्याने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

हातातील तलवारीने डोक्यात दोन वार केले. रक्त येत असल्याने अमोल खाली बसले असता धीरजच्या भावाने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने पाठीवर, मांड्यावर, पोटरीवर मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान जखमी अमोल यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar News : शाळेच्या पहिल्याच दिवशी मोठा अनर्थ टळला; अहमदनगरमध्ये कुठे घडला गंभीर प्रकार…

स्लॅबचे प्लॅस्टर कोसळले | ठेकेदारावर तातडीने कारवाईची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar News...

दुर्दैवी : विजेच्या शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

बेलवंडीतील घटना | ग्रामस्थांनी केला महाविरणाचा निषेध श्रीगोंदा | नगर सह्याद्री बेलवंडी शिवारात पडलेल्या विजेच्या...

पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला ; म्हणाले..

मुंबई: नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 सभा आणि एक रोड...

Nagar Arban Bank News : नगर अर्बन बँक घोटाळ्यात मोठी अपडेट; ‘त्या’ अधिकाऱ्याच्या खात्यात मोठे घबाड

अहमदनगर | नगर सह्याद्री Nagar Arban Bank News : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या...