spot_img
ब्रेकिंगमराठा आरक्षणाबाबतची सर्वपक्षीय बैठक संपली; 'हा' झाला महत्वपूर्ण निर्णय

मराठा आरक्षणाबाबतची सर्वपक्षीय बैठक संपली; ‘हा’ झाला महत्वपूर्ण निर्णय

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, यावरही देखील सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे. अडीच तास ही बैठक चालली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते. त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शय तितया लवकर करावी, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे.

राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये. राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार काशिनाथ दाते धावले शेतकऱ्यांच्या मदतीला; सरकारकडे केली मोठी मागणी

पारनेर । नगर सहयाद्री आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना गुरुवार (ता. ३) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व...

तिघांनी केली न्यायालयाची फसवणूक; नगरमध्ये अजब प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खोटे संमतीपत्र व शपथपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार...

चार जणांच्या टोळक्याचे युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- एका युवकावर चार जणांनी धारदार शस्त्र व लाकडी दांडक्यांनी...

शिर्डीत दुहरी हत्याकांड! दरोडेखोरांनी बाप-लेकाला संपवल

Ahilyanagar Crime News: एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे...