spot_img
अहमदनगर'आलमगीर' परिसरात हळहळ! दोघे मित्र घराबाहेर गेले पण परतलेच नाही? घडलं असं...

‘आलमगीर’ परिसरात हळहळ! दोघे मित्र घराबाहेर गेले पण परतलेच नाही? घडलं असं काही…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजमत जावेद शेख (वय 13 रा. आलमगीर, नागरदेवळे) व मोहम्मद साद अन्सारी (वय 16 रा. सदर बाजार, गरीब नवाज बेकरी जवळ, भिंगार) अशी मयत अल्पवयीन मुलांची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागरदेवळे (ता. नगर) शिवारातील ब्रम्हतळे, आलमगीर येथील अजमत शेख व मोहम्मद अन्सारी हे दोघे मित्र ब्रम्हतळे, आलमगीर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही त्यात बुडाले. दरम्यान, जवळच आर्मीच्या सैनिकांचा कॅम्प सुरू होता. त्या कॅम्पसाठी उपस्थित असलेल्या सैनिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने तलावाजवळ धाव घेत त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले व मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आलमगीर’ परिसरात हळहळ!
नागरदेवळे (ता. नगर) शिवारातील ब्रम्हतळे, आलमगीर येथील दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती समजल्यानंतर आलमगीर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या मृतदेहाचे सायंकाळी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार एम. टी. विधाते करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील गोगलगाव (ता. राहाता) येथे गुरुवारी एका पती-पत्नीचा संशयास्पद...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना’अच्छे’ दिन? वाचा, भविष्य..

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल-त्यामुळे तुमच्या कुटुंबातील...

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...