spot_img
अहमदनगरAhmednagar: कोरठण खंडोबा गडावर १७ जानेवारी पासूनअखंड हरिनाम नाम सप्ताह

Ahmednagar: कोरठण खंडोबा गडावर १७ जानेवारी पासूनअखंड हरिनाम नाम सप्ताह

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
प्रतिजेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा येथे वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्ताने १७ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम नाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे. वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने व कृष्णकृपांकित डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शालिनी घुले यांच्यासह उपाध्यक्ष महेश शिरोळे व विश्वस्त राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

सप्ताहा दरम्यान पहाटे ४ ते ६ काकडा भजन ५ ते ६ वाजता हरिपाठ ७ ते ९ वाजता हरि किर्तन होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पण करण्यात आले असून महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तने या सप्ताहांमध्ये होणार आहे.यामध्ये प्रामुख्याने १७ जानेवारी रोजी बीड येथील संतोष महाराज वनवे, १८ जानेवारी रोजी धारूर येथील प्रकाश महाराज साठे, १९ जानेवारी रोजी भिगवण येथील विकास महाराज देवडे, २० जानेवारी रोजी गेवराई येथील अक्रूर महाराज साखरे, २१ जानेवारी रोजी आष्टी येथील सुनील महाराज झांबरे, २२ जानेवारी रोजी पैठण येथील शिवानंदजी महाराज शास्त्री, २३ जानेवारी रोजी हिंगोली येथील सोपान महाराज सानप तर २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता परभणी येथील बाळू महाराज गिरगावकर यांच्या कालाचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन पांडुरंग गायकवाड, सचिव जालिंदर खोसे, चिटणीस कमलेश घुले, अशोक घुले, विश्वस्त राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे, सुवर्णा घाडगे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, महादेव पुंडे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले यांनी देवस्थानच्या वतीने केले आहे.

चौकट –
वार्षिक यात्रोत्सवाला सप्ताहाची जोड
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंताची कीर्तने आयोजित करण्यात आलेली आहे. वारकरी संप्रदायातील नाथा भांबरे, चेअरमन पोपट सुपेकर, बबन भांबरे महादू घुले, मार्तंड जगताप यांच्यासह वारकरी संप्रदायाच्या विनंतीनुसार वार्षिक यात्रोत्सवाला सप्ताहाची जोड दिली आहे.
-माजी सरपंच अशोक घुले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! पेरूच्या बागेत आढळला युवकाचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री साकुरी शिवारात मंगळवारी सकाळी राहाता येथील युवकाचा पेरूच्या बागेच्या शेडमध्ये मृतदेह...

‘मोंथा’ चक्रीवादळ महाराष्ट्राला देणार तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात ‘ऑक्टोबर हिट’मुळे तापमान वाढले असताना आता हवामानात अचानक बदल होण्याची...

आजचे राशी भविष्य! आज ‘या’ राशींना आश्चर्याचा सुखद धक्का बसणार, वाचा, तुमचे राशी भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्यपैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते...

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...