spot_img
महाराष्ट्रअजित पवार बूथ ताब्यात घेणार? गुंडाला जवळ करणार! आमदार रोहित पवार यांचे...

अजित पवार बूथ ताब्यात घेणार? गुंडाला जवळ करणार! आमदार रोहित पवार यांचे गंभीर आरोप

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
शरद पवारांना मर्यादित ठिकाणी ठेवण्यासाठी भाजपाला पवार विरुद्ध पवार अशी लढाई करायची आहे. अजितदादांकडून कुठला उमेदवार येईल हे पहावे लागेल. भाजपाकडून बारामतीत पैशांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात सुरु असून अनेकांना धमया येत आहेत. अशा स्तरावर गोष्टी जात असतील आणि दादा गुंडांना जवळ करत असतील तर येणार्‍या काळात बूथ ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न हा अजितदादांच्या पक्षाकडून केला जाईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर केला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की, बीडमध्ये जे घडलं ते सत्तेतील लोकांनीच केले. गुंडांना आणून ते केले गेले. खरेतर याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. गेल्या काही दिवसांत काही गुंड एकनाथ शिंदेंना भेटतात. देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात, अजित पवारांना गुंड भेटतात. मग लोकसभेला तुम्ही गुंडाचा वापर करणार आहे का? मला वाईट याचं वाटतं देवेंद्र फडणवीस रोज गुंडांना भेटतात, एकनाथ शिंदे भेटत असावेत. पण आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केले. ही तुमची प्रवृत्ती, ही तुमची वृत्ती. भाजपाच्या जवळ गेल्यानंतर अजित पवार गुंडाचा वापर करणार का? असा सवालही त्यांनी विचारला.

तसेच शरद पवार कुठेही अडकून राहत नाहीत. प्रत्येक मतदारसंघात फिरतात. जे लोक सोडून भाजपासोबत गेलेत त्यांनाही निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी प्रचार केलाय. अजितदादा पुण्यात इतया मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर करतायेत. माझ्या मतदारसंघात ज्या व्यक्तीला मोक्का लागलाय त्याच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देत आहात? हा महाराष्ट्र आहे, इथली लोक गुंडापेक्षा मोठी आहेत. येत्या काळात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनता या सरकारला करेट कार्यक्रम करतील असा आम्हाला विश्वास आहे असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...

​कामरगावात दुकानदाराचे घर फोडले; पावणेदोन लाखांचा ऐवज लांबविला

​लबाडीच्या इराद्याने घरातील वस्तू, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला; नगर तालुका पोलिसांत गुन्हा...