spot_img
महाराष्ट्रअजित पवार शरद पवारांची भेट, तास भर चर्चा.. त्यानंतर अजित दादा थेट...

अजित पवार शरद पवारांची भेट, तास भर चर्चा.. त्यानंतर अजित दादा थेट अमित शहांच्या भेटीला रवाना, पडद्यामागे मोठ्या हालचाली

spot_img

पुणे / नगर सह्याद्री :
महाराष्ट्रात सतत काहीनाकाही घडामोडी घडत असतात. आता पुन्हा एकदा राजकीय घडामोड झाली आहे. राजकरणात चर्चाना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट झाली.

शरद पवार यांचे चुलत बंधू प्रतापराव पवार यांचे पुण्यातील बाणेर येथे निवासस्थान आहे. यावेळी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्य येथे उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. प्रतापराव पवार यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमे शरद पवारांपर्यंत पोहोचली.

शरद पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नवं वर्ष सुख-समृद्धीने भरून जावो,’ असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलणे टाळले.

दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबीय बारामतीतील गोविंद बागेत एकत्र येतात. तेथे पवार कुटुंबीय सर्वसामान्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकारतात. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची तब्येत ठीक नाही.

गोविंद बागेत येऊ न शकल्याने पवार कुटुंबीय आज प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी जमल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. येथे शरद पवार सुप्रिया सुळे व अजित पवार यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर ते अमित शहा यांना भेटायला दिल्लीत रवाना झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...