spot_img
महाराष्ट्रलोकसभेला बारामतीमधला अजित पवारांचा उमेदवार ठरला? प्रचाराचा रथ फिरणार

लोकसभेला बारामतीमधला अजित पवारांचा उमेदवार ठरला? प्रचाराचा रथ फिरणार

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरु होईल. कोण कुठे कोणता उमेदवार उभा राहील याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर्क वितर्क लावले जात आहेत. सध्या चर्चा सूर आहे ती म्हणजे बारामतीची. कारण तेथे पवार विरोधात पवार अशी लढत होईल असे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा लढणार आहे. तसेच महायुतीकडून अजित पवार गटास ही जागा मिळणार आहे. महायुतीकडून अजित पवार गटाकडून कोण असणार? हे निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.

प्रचाराचा रथ तयार, कार्याची माहिती
बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहे. बारामतीमध्ये केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ लागला फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर फ्लॅक्स लावले आहे. त्यात सुनेत्रा पवार यांचा मोठा फोटो घेतला आहे. तसेच अजित पवार यांचाही फोटो आहे.

सुनेत्रा पवारही सक्रिय
सुनेत्रा पवार सक्रीय झाल्या असून त्यांनी राहुल कुल यांच्या घरी सदिच्छा भेट देत चर्चा केली. राहुल कुल हे भाजपचे आमदार तर कांचन कुल 2019 साली भाजपच्या उमेदवार होत्या. दौंड तालुक्यातील राहू येथे सुनेत्रा पवार यांनी कुल कुटुंबियांची भेट घेतली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...