spot_img
ब्रेकिंगअजितदादांकडून ‘नगर सह्याद्री’च्या ‘झुंडशाही विरोधातील’ निर्भिड लेखणीचे अन् भूमिकेचे अप्रत्यक्ष समर्थनच!

अजितदादांकडून ‘नगर सह्याद्री’च्या ‘झुंडशाही विरोधातील’ निर्भिड लेखणीचे अन् भूमिकेचे अप्रत्यक्ष समर्थनच!

spot_img

गुन्हेगारी अवलाद जन्माला येण्याआधीच गाडून टाकण्यासाठी कणखर भूमिका!

शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री

नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील गुंडगिरीच्या विरोधात आम्ही सातत्याने भूमिका मांडली. गल्लीबोळातील टारगट पोराला तुम्ही- आम्ही घाबरलो, त्याला त्याच्या वयापेक्षा जास्त सन्मान देऊ लागलो की त्याच्यातील दहशत- गुंडगिरी- भाईगिरीला कसे खतपाणी मिळते हे आपण सार्‍यांनीच गेल्या पंचवीस- तीस वर्षापूर्वी पाहिले आणि अनुभवले! नगरमधील या गुंडगिरीच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडण्याचे काम आम्ही आमच्या पत्रकारीतेतून केले. गेल्या काही दिवसात नगरमध्ये तीच भूमिका आम्ही मांडली. आमची व्यक्तीगत कोणाशीच दुष्मनी नाही. बांधभाऊ तर नक्कीच नाही! जन्माला येणारी गुंडगिरी लागलीच मोडून काढण्याची भूमिका आम्ही सातत्याने घेतली. कारण, जन्माला येऊ घातलेल्यांना रोखले नाही तर अशा अवलादी जिल्ह्यातील सामान्य जनतेचं, व्यापारी- उद्योजकांचं कंबरडं कसं मोडतात हे कमी अधिक फरकाने सार्‍यांनीच अनुभवलं! स्व. अशोक लांडे खून प्रकरणापासून ते आतापर्यंत ज्या-ज्यावेळी अशा अवलादींनी डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला त्या-त्यावेळी आम्ही आमचे परखड विचार मांडले. त्यातून प्रशासनाला जाब विचारला तर कधी आम्ही थेट जनतेच्या दरबारात गेलो. षंड माणसं बंड करत नसतात, हे पटवून देण्याचा प्रयत्न करताना गुंडांच्या विरोधात बंड करण्यास जनतेला प्रवृत्त करण्याचा ‘सारिपाट’ आम्ही मांडला! अपप्रवृत्तीच्या विरोधातील आमची ही लढाई काहींना एकांगी वाटली असेल! त्यात आमचा दोष नाही! त्यांचा चष्माच तसा असेल! मात्र, काल जाहीर सभेत अजित पवार यांनी उलट्या हाताने घेत जी भूमिका मांडली ती आमच्या भूमिकेचं अप्रत्यक्ष समर्थन देणारीच ठरली!

|सत्तेच्या मलिद्याचा वाटा मिळेपर्यंत आणि टपोरी छाप कार्यकर्त्यांच्या गळ्याला लागलेला कायद्याचा फास सैल करेपर्यंत सत्तेचा फायदा घ्यायचा आणि स्वार्थ दिसताच त्याच सत्तेच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात भूमिका बदलणार्‍यांचे काय करायचे हे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. पत्रकारीतेमध्ये गेली तीन तप काम करताना गेल्या पाच- सहा वर्षात पारनेरमध्ये जे स्थीत्यंतर झाले त्याचा फक्त साक्षीदारच नव्हे तर त्यातील अनेक घटना कशा पेरल्या आणि त्यातून कसे इप्सीत साध्य केले या पापाचा वाटेकरी मी देखील असल्याचे जाहीरपणे सांगायला आम्हाला कमीपणा वाटत नाही. हे सारे करताना तालुक्याला सामान्य कुटुंबातील, प्रस्थापितांच्या विरोधातील एक चेहरा भेटेल आणि सामान्य जनतेला अच्छेदिन येतील अशी आमची भावना होती.

मात्र, साठ हजाराचं मताधिक्य आणि गुलाल अंगावर पडताच दोनशेपेक्षा जास्त चार चाकी वाहनांवर विधानसभेचा लोगो आणि आमदार असे स्टीकर आले. यातील ‘आमदार’ असं स्टीकर असणारी पन्नास टक्केपेक्षा जास्त वाहने मुळा- कुकडी नदीपात्रात वाळूची शेती करताना दिसू लागली. वाळूच्या डंपरला आमदाराचा लोगो असणारी अलिशान गाडी एस्कॉर्टींग करताना पाहून अनेकांनी कपाळावर हात मारुन घेतले आणि पश्चातापाची भावना व्यक्त केली. त्या पापाचे धनी आपणच अहोत हे सांगण्यास अनेकजण पुढे आले हेही मुद्दामपणे निदर्शनास आणून दतो. विजय औटी यांच्या सौभाग्यवती जयश्री औटी हे पंचायत समितीच्या माजी सभापती! ‘माझे पती पंधरा वर्षे आमदार होते, पण ते वगळता अन्य कोणाच्याही गाडीवर आमदार असा स्टीकर लावलेला नव्हता. इथे दोनशेपेक्षा जास्त गाड्यांवर आमदारकीचा लोगो अन् स्टीकर,  त्यातील बहुतांश वाहने नदीपात्रात’, जयश्री औटी यांचा हा भांडाफोड बराच बोलका आहे.

उद्या खासदार झाल्यानंतर लष्कराच्या कँपसमध्ये ‘खासदार’ लोगो लावून हजारो वाहने फिरताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये! जाहीर प्रचार संपण्यास काही अवधी बाकी असताना डुप्लीकेट मतदान कसे आणि किती वाजता करायचे याची ऑडीओ क्लीप समोर आलीय आणि तसे आदेश कोण देत आहे हेही! पहिल्या टप्प्यात ऐ कलेक्टर, दुसर्‍या टप्प्यात पोलिसाचा बाप अन् शेवटच्या टप्प्यात डुप्लीकेट मतदान कसे करायचे याचे मार्गदर्शन! व्वा रे सामान्य चेहरा! मतदारांनो कणखर भूमिका घ्या! वेळ अद्यापही तुमच्या हातात आहे! पारनेरकरांना पश्चातापाची भावना आलीय! तुम्हाला काय हवंय ते तुम्ही ठरवा! निर्भयपणे मतदानाचे कर्तव्य पार पाडा! लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि तुमच्या उद्याच्या पिढीचे भवितव्य अधिक जाज्वल्य करण्यासाठी तुमचं एक मत निर्णायक असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...