spot_img
अहमदनगरआईराजा उदोउदो..., सदानंदीचा उदोउदो..., तुळजाभवानी माताकी जय...!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय…!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
बुर्‍हाणनगर ता.नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची महापूजा, अभिषेक करून दुपारी १२ वाजता आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय… या जयघोषात भक्तिपूर्ण वातावरणात विविधीत घटस्थापना झाली.
यावेळी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबियांच्या सुवासिनींनी फेटे परिधान करत डोयावर सजवलेले घट घेवून मंदिराला वाजतगाजत प्रदक्षिणा मारली. यावेळी भगत परिवाराच्या सदस्यांनी भगवे ध्वज, अबकारी घेत तुळजाभवानी देवीचा जयजयकार करत होते.

या प्रदक्षिणे नंतर मंदिराचे मुख्य पुजारी अ‍ॅड.विजय भगत, सौ.दुर्गा भगत, अ‍ॅड.अभिषेक भगत व कुणाल भगत यांनी मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली. नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढण्यात आली होती तसेच फुलांच्या माळांनी देवीचे रूप अधिकच प्रसन्न वाटत होते. मंदिर गाभार्‍यातही विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. घाटांच्या प्रदक्षिणेच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या निंबोडी शाखेच्या लहान मुलींनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिके सदर करून उपस्थितांची मने जिंकली.

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बुर्‍हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही सजावट करण्यात आली आहे. ऑटोबर महिना असल्याने भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आले आहेत. तसेच देवीच्या मुखदर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

यासाठी वेगळी रांग असणार आहे. भाविकांना २१ तास देवीचे दर्शन करता येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पुढील १० दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन श्री बुर्‍हाणनगर देवी या पेजवर सर्व समाज माध्यमांवर उपलब्ध आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी अ‍ॅड.अभिषेक भगत यांनी देवून सर्व भाविकांनी येथील धार्मिक कार्याक्रमांचा व देवीच्या दर्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी राजेंद्र भगत, अंजली भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कविता भगत, ऋषिकेश भगत, अ‍ॅड.अजिंय भगत, वैभवी भगत, अंकिता भगत, अ‍ॅड.संकेत भगत, अक्षदा भगत, दिप्तेश राऊत व वेद भगत आदींसह सुवेंद्र गांधी उपस्थित होते.

केडगाव देवी भाविकांचे श्रद्धास्थान: सातपुते
केडगाव देवी मंदिराला धार्मिकतेचा मोठा वारसा असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने भावीक वर्ग दर्शनासाठी येत असतात. केडगाव ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीने भाविकांची दर्शनाची सोय केली जाते. नगर शहरांमधून मोठ्या संख्येने महिला भगिनी दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या सुरक्षेतेची काळजी या ठिकाणी घेतली जाते. श्री रेणुका माता मंदिरात घटस्थापनेचा मान सातपुते कुटुंबाला मिळाला. यावेळी देवीचरणी सर्व नागरिकांना सुख समृद्धी व आनंददायी जीवन जगण्यासाठी शक्ती देवो, समाजाप्रती चांगली सेवा करण्याची संधी देवो अशी प्रार्थना ओंकार दिलीप सातपुते यांनी व्यक्त केली. नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवस्थान मंदिरात ओंकार दिलीप सातपुते यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली यावेळी पत्नी धनश्री सातपुते, दिलीप सातपुते, भाविक भक्त व पुजारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“…म्हणजे हा सुनियोजित कट”; आ. राम शिंदे यांच्या दाव्याने महायुतीत नवा ट्वीस्ट!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री- मी नियोजित कटाचा बळी ठरलो, असा आरोप करत राम शिंदेंनी थेट...

कामगार हादरले! MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; प्लँट ऑपरेटर..

Maharashtra News Today: एका रासायनिक कंपनीमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ...

मी पुन्हा येईन! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच? १३७ आमदारांचा पाठिंबा, दिल्लीत महत्त्वाची बैठक

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा...

बळीराजासाठी जुगाड! पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा वापरा ‘ती’ ट्रिक्स..

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी...