spot_img
अहमदनगरAhmednagr News : गारपीटग्रस्तांना मिळेना नुकसान भरपाई, महसूल व कृषी विभागाचा हलगर्जीपणा

Ahmednagr News : गारपीटग्रस्तांना मिळेना नुकसान भरपाई, महसूल व कृषी विभागाचा हलगर्जीपणा

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील काही गावांतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. महसूल विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आठ दिवसांत ही मदत न मिळाल्यास तहसीलसमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

पारनेर तालुक्यातील पानोली, वडुले, सिद्वेवरवाडी, सांगवी सूर्या, गांजी भोयरे, जवळा, वडनेर हवेली गटेवाडी, पारनेर येथील शेकडो शेतकऱ्यांचे कांदा, मका, वाटाणा, ऊस, फळबागांसह मोठे नुकसान झाले. तब्बल चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावरील पिंकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. परंतु पंचनामे होऊनही मदत मिळेना. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी नुकसान भरपाई जाहीर केली. काही शेतकऱ्यांना तातडीने पैसे दिले. परंतु अद्यापी अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या त्रुटी सांगून अजूनपर्यत भरपाई दिली नाही. याबाबत तहसील कार्यालयात चौकशी केली असता, सर्व्हर बंद होते अशी कारणे सांगितली जातात. येत्या १्५ दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असून तसे झाल्यावर ही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते नारायण गायकवाड, संतोष खोडदे, अंकुश गायकवाड, बी. ए. भगत यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

तहसीलदारांचे दुर्लक्ष, शेतकरी वाऱ्यावर
तालुक्यात पंचनाम्याप्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे महसूल विभागाकडे जमा झाले. मात्र, महसूल विभागाच्या ढिम्म कारभारामुळे, तसेच तलाठी मंडलाधिकारी व पंचनाम्यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत नाहीत. याकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...