spot_img
अहमदनगरAhmednagar: नगरमध्ये २२ जानेवारीला दोन मार्ग बंद राहणार? नेमकं कारण काय

Ahmednagar: नगरमध्ये २२ जानेवारीला दोन मार्ग बंद राहणार? नेमकं कारण काय

spot_img

अहमदनगर | नगर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे जाणारी पदयात्रा २१ व २२ जानेवारीला नगर जिल्ह्यातून जाणार आहे. जिल्ह्यात पाथर्डी तालुयातील मीडसांगवी ते पुणे महामार्गावर घोडनदीपर्यंत सुमारे १३० किलोमीटर अंतर यात्रा जाणार असल्याने पोलिस प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे.

यात्रेतील सहभागींची संख्या पाहून त्यादृष्टीने पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. दरम्यान, यात्रा मार्गाचे नकाशे तयार केले असून, गर्दी जास्त असल्यास २१ तारखेला नगर ते पाथर्डी महामार्ग व २२ तारखेला नगर ते पुणे महामार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात येईल, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

जिल्ह्यात २१ जानेवारीला तनपूरवाडी येथे पदयात्रा पोहचणार आहे. तेथून नगर पाथर्डी महामार्गावरून यात्रा नगरजवळ बाराबाभळी येथे मुक्कामी येणार आहे. तेथून २२ जानेवारीला नगरमार्गे सुपा, रांजणगावच्या दिशेने यात्रा जाणार आहे. पाथर्डी-नगर व नगर-पुणे महामार्गावरून ही यात्रा जाणार असल्याने पोलिस प्रशासनाने या मार्गावरील बंदोबस्त, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आदींचे नियोजन सुरू केले आहे. संपूर्ण यात्रा मार्गावर पोलिस बंदोबस्त असणार आहे.

आंतरवाली सराटी येथून नगरला येईपर्यंत यात्रेत कितीजण सहभागी होतात, त्याचा अंदाज घेऊन आवश्यक बंदोबस्त व वाहतूक वळवण्याचे नियोजन केले जाणार आहे. गर्दी जास्त असल्यास यात्रा पुढे जाईपर्यंत महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, नगर शहरातून जीपीओ चौक, मार्केट यार्ड, बसस्थानक चौक, सक्कर चौक, कायनेटिक चौक, केडगावमार्गे पुणे महामार्गाने यात्रा रवाना होणार आहे. त्यामुळे नगर शहरातही मोठी वाहतूक कोंडी होण्याची शयता आहे. त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...