spot_img
अहमदनगरAhmednagar:..'हा' तर अजब फ़ंडा! नोकरदाराला घातला ‘ऐवढ्या’ लाखांना गंडा, घडलं असं काही..

Ahmednagar:..’हा’ तर अजब फ़ंडा! नोकरदाराला घातला ‘ऐवढ्या’ लाखांना गंडा, घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका खासगी नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि.२६) सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात व्हॉट्सअॅप नंबर धारक रजतसिंग रजपुत नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त: सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता येथे राहणाऱ्या खासगी नोकरदाराच्या फिर्यादीनुसार, ६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान त्यांना एका व्हॉट्सअॅप नंबरवरून रजतसिंग रजपूत नामक व्यक्तीने संपर्क केला. शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

रजपूत याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी देखील रजपुत याच्यावर विश्वास ठेऊन त्याला ट्रेडिंगसाठी वेळोवेळी पैसे दिले. त्यांनी ६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान एकूण २४ लाख २५ हजार रूपये दिले.

दरम्यान, रजपुत याने फिर्यादी यांना ट्रेडिंगमधील नफा दिला नाही. त्याला वेळोवेळी संपर्क करून देखील त्याने प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी येथील सायबर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री    श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा...

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...