अहमदनगर। नगर सहयाद्री
शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या व्यवसायावर जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने धाड मारली आहे. अन्नधान्य वितरण विभागाच्या पुरवठा निरीक्षक निशा मोरेश्वर पाईकराव (रा. चांदणी चौक, नगर) यांच्या फिर्यादीवरून पसार आरोपी सनी दत्ता शिंदे (रा. वैदुवाडी, सावेडी) व विशाल विजय कांबळे (रा. नालेगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अवैधरित्या व्यवसाया सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने मंगळवारी दि ३१ रोजी दुपारच्या सुमारास सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारस्कर मळा या ठिकाणी सुरु असलेल्या अवैधरित्या गॅस रिफिलिंग व्यवसायांवर धाड टाकली. त्यावेळी गॅस भरणारा इसम त्या ठिकाणाहून पळून गेला. सनी दत्ता शिंदे (रा. वैदुवाडी, सावेडी) असे त्याचे नाव आहे.
दुसरी कारवाई दुपारी दोनच्या सुमारास नालेगाव अमरधाम शेजारी असलेल्या शासकीय जागेत विशाल विजय कांबळे गॅस रिफिलिंग सेंटर चालविताना आढळुन आला. दोन्ही ठिकाणाहून गॅस रिफिलिंग मशीन, वजन काटा, गॅसच्या भरलेल्या व रिकाम्या टाक्या असा एक लाख आठरा हजार दोनशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.