spot_img
ब्रेकिंगAhmednagar: इंडिगो सी.एस कारसह 'ते' दोन तस्कर 'जेरबंद'; 'असा' लावला सापळा

Ahmednagar: इंडिगो सी.एस कारसह ‘ते’ दोन तस्कर ‘जेरबंद’; ‘असा’ लावला सापळा

spot_img

श्रीरामपूर। नगर सहयाद्री-

श्रीरामपूर तालुक्यातील दिघी रस्त्यावर दोन सराईत तस्करांना श्रीरामपूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्या आरोपीचे नावे अस्लम यासीन मन्सुरी (वय 40, धंदा-मजुरी, रा. भैरवनाथनगर), शाहरूख युनुस शेख (वय 29, रा. बर्फ कारखानाच्या पाठीमागे, संजयनगर) असे असून त्यांच्याकडून सहा लाख ऐक्यशी हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधीक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमीदाराकडून दोन तस्कर शिर्डीमधून दिघीमार्गे एका चार चाकी वाहनाने श्रीरामपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी तात्काळ पथकासह सुतगिरणी रेल्वे फाटक गाठले. दिघी रोड कडे जात असतांना त्यांना समोरुन एक पांढर्‍या रंगाचे चार चाकी वाहन येताना दिसले.

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी समोरून येणार्‍या त्या चार चाकी वाहन ( इंडिगो सी.एस. , क्र. एम.एच.४४ बी. ९९९१) ला आवाज देवून थांबण्याचा इशारा केला.

सदर इसमाने गाडी थांबवली, पोलीस पथकाने पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये दोन गोण्या भरलेल्या आढळून आल्या. गोण्याचे तोंड सोडुन पाहणी केली असता त्यात गांजा असल्याचे समोर आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...