spot_img
अहमदनगरAhmednagar breaking: कारागृहातील चार कैदी पसार; 'असा' घडला प्रकार

Ahmednagar breaking: कारागृहातील चार कैदी पसार; ‘असा’ घडला प्रकार

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री

संगमनेर शहर पोलीस ठाणे शेजारीच असणार्‍या जेलमधील चार आरोपींनी जेलचे गज तोडून पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कैदी पळून गेल्याने पोलिसांची पळापळ झाली. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. कारागृहातून कैदी पळाल्याने संगमनेर जेल प्रशासनाची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाणे शेजारीच उपकारागृह बांधलेले आहे. या कारागृहात तीन बराकी असून २४ कैद्यांची क्षमता असतानाही अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी जेलमध्ये असतात. कारागृहामध्ये कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आदी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने संगमनेरचे कारागृह नेहमी चर्चेचा विषय असते. जेलच्या बंदोबस्तावर असणारे पोलीस व कैदी यांच्यातील वादामुळे हे कारागृह वादग्रस्त ठरले आहे. संगमनेच्या कारागृहात सध्या अनेक कैदी आहेत. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून जाण्यात यशस्वी ठरले. शिक्षा भोगत असलेले राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे हे पळून गेले आहेत.

अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आरोपींनी पळ काढला. बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्याने गाणे, आरत्या सुरू होत्या. या गोंधळात चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार अगोदरच येऊन थांबली होती. जेल तोडून हे कैदी कारमध्ये बसून पसार झाले. जेलमधून कैदी पळून गेल्याचे पोलिसांना समजताच त्यांची धांदल उडाली. तिघेजण जेलच्या बंदोबस्तासाठी नियुक्त होते. त्यांनी कैदी पळून गेल्याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर तातडीने पोलीस पथके तयार करून नाशिक व इतर ३ ठिकाणी पाठवले.

पळून गेलेले आरोपी गंभीर गुन्ह्यातील असल्याने त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. कैदी पळून गेल्याने पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेलमधील कैद्यांकडे अँड्रॉइड मोबाईल होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हा मोबाईल त्यांना कोणी पुरवला, त्यांना घेऊन जाणारे वाहन कोणाचे होते, बंदोबस्ताला तीन पोलीस असतानाही कैदी पळून कसे गेले आदी प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत.

पोलीस निरीक्षक चौकशीच्या भोवर्‍यात?
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे रात्री बंदोबस्तावर होते. तुरुंगाची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. खुद्द पोलीस निरीक्षक बंदोबस्तास असतानाही जेलमधील कैदी पळून गेले आहेत. यामुळे पोलीस निरीक्षकांची चौकशी होण्याची शयता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...