अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर-पुणे महामार्गावर रस्तारोको अंदोलन आदोलकांच्या अगलट आल्याची माहिती समोर आली आहे. मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी केलेल अंदोलन शिंदे गटाच्या शहर प्रमुख व नगरसेवकासह ४० जणांना भोवलं आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मच्छिंद्र पांढरकर यांच्या फिर्यादीवरून ४० जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी नगर-पुणे महामार्गावरअंबिकानगर बस स्टॉप समोर नगरसेवक ज्ञानेश्वर येवले व संग्राम कोतकर यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली मंगळवारी दि. 31 रोजी रस्ता रोको अंदोलन करण्यात आले होते.
नगर-पुणे महामार्ग रास्तारोको आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरसेवक ज्ञानेश्वर शिवाजी येवले, शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, संग्राम संजय कोतकर, नगरसेवक विजय पठारे,यांच्यासह इतर अनोळखी ३० ते ३५ जणांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.