spot_img
अहमदनगरAhmednagar :सीना नदीवरील पुलास अखेर मंजुरी ! खा. विखे व आ. जगतापांच्या...

Ahmednagar :सीना नदीवरील पुलास अखेर मंजुरी ! खा. विखे व आ. जगतापांच्या उपस्थितीत भूमिपूजन

spot_img

अहमदनगर/ नगर सह्याद्री
Ahmednagar News : नगर-कल्याण महामार्गावरील नेप्ती चौकाजवळील सीना नदीवर नवा पूल उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन उद्या गुरुवारी (23 नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजता खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर नगर शहरातील नेप्ती चौकाजवळ सीना नदीवर हा नवा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याचा येथील पूल जुना झाला असून तो उंच नसल्याने पावसाळ्यात सीना नदी पुराचे पाणी या पुलावर येते. परिणामी नगर-कल्याण महामार्ग वाहतूक ठप्प होते. तसेच या परिसरातील शिवाजीनगर, नालेगाव, भूषणनगर या भागातील शहरांतर्गत वाहतूकही विस्कळीत होते. या पार्श्वभूमीवर नव्याने येथे होणाऱ्या दुपदरी उंच पुलाने नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसह स्थानिक वाहतुकीचाही प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

दोघांच्या हस्ते भूमिपूजन
खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते दि. २३ नोव्हेंबर रोजी सायं ५ वाजता सीना नदीच्या पुलाचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमास भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, शिवसेना दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिलराव शिंदे, महापौर रोहिणीताई शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या पुलाच्या कामाच्या निधीसाठी सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्याची दखल घेऊन निधी मंजूर करण्यात आला आहे.

कल्याण-अहमदनगर-पाथर्डी-नांदेड-निर्मळ या २१४.१८० किमी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील सिना नदीवर जोड रस्ते व काँक्रिट गटारसह मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत रु. २७.१६ कोटी रकमेस मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून पुलाच्या बांधकामात जोड रस्ते, संरक्षक भिंत, फुटपाथसह काँक्रिट गटार, पथदिवे,ठिकाणी संगमस्थान सुधारणा यातून पुलाचे सुशोभिकरणही होणार आहे.

या पुलासाठी निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खासदार डॉ.सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी आभार मानले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गाडेंचे बंड शमलं अन् शिवसैनिकांची शेवटची आशा देखील!

सारिपाट / शिवाजी शिर्के- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नगर शहरातील उमेदवारीसाठीचा सर्वात प्रबळ असणारा पक्ष...

नगर-पारनेरमध्ये परिवर्तनाची लाट उसळणार; नेमकं कोण काय म्हणाल पहा…

संदेश कार्ले | गावात आलेल्या उमेदवारांना मतदारांनी जाब विचारावा पारनेर | नगर सह्याद्री-  पक्ष पाहुन...

“तुमच्या चार पिढ्या आल्या तरी…”; अमित शाहांचे शरद पवारांना थेट आव्हान

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली...

लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट; पंतप्रधान नेमकं काय म्हणाले पहा…

धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल धुळे / नगर सह्याद्री : लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा...