अहमदनगर । नगर सहयाद्री-
आमिष दाखवून युवतीवर कॅफे व हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित युवतीने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात नेवासा तालुक्यातील तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय वाबळे (रा. नारायणवाडी ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अधीक माहिती अशी: सदरची घटना १५ जून २०२३ ते १७ मार्च २०२४ दरम्यान वेळोवेळी नगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील चाणक्य चौकात असलेल्या रिचकिंग कॅफेत व दौंड रस्त्यावरील हॉटेल राजवीर येथे घडली. अक्षय याची फिर्यादी युवतीसोबत ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. वेळोवेळी रिचकिंग कॅफे व हॉटेल राजवीर येथे घेऊन जात इच्छेविरूध्द अत्याचार केला.
दरम्यान युवतीने अक्षयकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. ‘तु माझ्याशी पुन्हा लग्नाबद्दल बोललीस तर मी तुला जिवे ठार मारेल व मी सुध्दा माझ्या जिवाचे काहीतरी करून घेईल’ अशी धमकी दिली.घडलेल्या घटनेबाबत युवतीने तिच्या आई-वडिलांना माहिती दिली व त्यानंतर कोतवाली पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली आहे.