spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग: ठाकरे गटाचे १७ उमेदवार फायनल! संभाजीनगर मतदारसंघात कोण? पहा लिस्ट..

ब्रेकिंग: ठाकरे गटाचे १७ उमेदवार फायनल! संभाजीनगर मतदारसंघात कोण? पहा लिस्ट..

spot_img

Lok Sabha 2024:शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. १७ जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. २२ जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काही विद्यामान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर काही नव्या चेहर्‍यांनाही संधी देण्यात आलेली आहे.

ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई वायव्य या मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करत या दोन जागा ठाकरे गटाने आपल्याकडे घेतल्या आहेत.

ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
१ बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
२. यवतमाळ- संजय देशमुख
३. मावळ – संजोग वाघेरे- पाटील
४. सांगली -चंद्रहार पाटील
५. हिंगोली- नागेश अष्टीकर
६. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
७. धाराशीव- ओमराजे निंबाळकर
८. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
९. नाशिक- राजाभाऊ वाझे
१०. रायगड – अनंत गिते
११. रत्नागिरी – सिंधुदुर्ग – विनायक राऊत
१२. ठाणे – राजन विचारे
१३. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
१४. मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
१५. मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
१६. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
१७. परभणी- संजय जाधव

शिर्डीत वाकचौरे विरोधात खा. लोखंडे
शिर्डीत उद्धव ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर सध्याचे खा.सदाशिव लोखंडे यांनी आपल्याला उमेदवारी भेटणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता सध्या तरी भाऊसाहेब वाकचौरे व खा.सदाशिव लोखंडे यासिनही लढत होऊ शकते असे सध्या तरी चित्र आहे.

आघाडी धर्म पाळा, अजूनही वेळ गेली नाही; आ. थोरात
उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिली यादीवर काँग्रेसनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही वेळ गेली नाही असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजगी पसरली आहे. काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांचा बाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे असं माझे मत असून अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...