spot_img
अहमदनगरAhmednagar : सुजित झावरे पाटील यांचा आ. लंके, खा. विखेंवर मोठा घणाघात,...

Ahmednagar : सुजित झावरे पाटील यांचा आ. लंके, खा. विखेंवर मोठा घणाघात, नुकसान ग्रस्तांच्या पाहणीवरून केली ‘ही’ टीका

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री
Ahmednagar Politics : आ. नीलेश लंके व भाजप नेत्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्याची स्टंटबाजी करण्याऐवजी सरकारच्या दारात जाऊन बसावे आणि तातडीने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले आहे.

झावरे म्हणाले, प्रत्येकवेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची स्टंटबाजी आ. लंके आणि भाजप नेत्यांनी सोडावी. हे केवळ नाटक आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सत्ता यांचीच आहे.

त्यामुळे त्यांनी केवळ पाहणी करण्याचे नाटक न करता शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. मागीलवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथे आणून असेच केले गेले. त्यावेळच्या नुकसानीचा एक रूपया शेतकर्‍यांना मिळाला नाही.

खा. सुजय विखे पाटील आणि आ. नीलेश लंके यांचे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. त्यांनी बांधावर जाण्याचे नाटक करण्यापेक्षा सरकारच्या दारात जाऊन बसावे. तेथून तातडीने नुकसान भरपाई आणावी, असेही झावरे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिल्लीचं वऱ्हाड महाराष्ट्रात येणार? राहुल गांधी अडकणार विवाहबंधनात? खा. प्रणिती शिंदे..; चर्चांना उधाण

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि महायुती व महाविकास...

सातपुते कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या लँड माफिया गुंडांवर कडक कारवाई करा

शहर भाजपाची पोलीस अधिक्षकांकडे मागणी अहमदनगर / नगर सह्याद्री - सोमवारी सायंकाळी केडगाव येथे भाजपाचे मंडल...

मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार! ‘त्याला’ निवडणुकीत धडा शिकवणार, १७ सप्टेंबर पासून..

जालना | नगर सह्याद्री:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे....

केडगाव बायपास रस्त्यावरील खुनी हल्ला करणारे काही तासातच गजाआड; कोतवाली पोलीसांची कारवाई

अहमदनगर । नगर सहयाद्री:- उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून चार जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण...