spot_img
अहमदनगरअहमदनगर: धक्कादायक! मुलगी हरवली म्हणून तक्रार दिली; खरी माहिती मिळताच पायाखालची जमीन...

अहमदनगर: धक्कादायक! मुलगी हरवली म्हणून तक्रार दिली; खरी माहिती मिळताच पायाखालची जमीन सरकली

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री

नगर शहरातील एका उपनगरात एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरवलेल्या मुलींबाबत खरी माहिती समोर आल्यानंतर मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी युवकाच्या विरोधात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सोहेल ऊर्फ सोएब शफीमहंमद शेख (वय 20 रा. सिव्हिल हाडको) असे त्याचे नाव आहे.

मुळच्या उत्तर प्रदेशातील एक कुटूंब सध्या नगर शहरात वास्तव्यास आहे. त्याची अल्पवयीन मुलगी बुधवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास किराणा दुकानात जाऊन येते, असे सांगून गेली असता ती परतलीच नाही.

घाबरलेल्या कटुबांने मुलीचा शोध घेतला मात्र शोध न लागल्याने कटुबांने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुरूवातीला भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला व मुलीचा शोध सुरू केला.

पोलीस पथकाने मुलीचा शोध घेतला असता मुलगी सोहेल ऊर्फ सोएब शफीमहंमद शेख याच्यासह मिळून आली. त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

मुलीने दिलेल्या जबाबावरून असून सोहेल ऊर्फ सोएब शफीमहंमद शेख याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...

‘गोड’ साखरेचा हंगामा ‘कडवट’, साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर

नगर सह्याद्री टीम- यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत उसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. सुरू झालेल्या...