अहमदनगर | नगर सह्याद्री
बहुचर्चित रेखा जरे खून खटल्यातील संशयित आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला आहे. न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यासमोर जामीन अर्जावर मंगळवारी (दि. २३) सुनावणी झाली. त्यांनी जामीन अर्ज नामंजूर केल्याची माहिती अॅड. नारायण नरोडे यांनी दिली.
रेखा जरे यांचा तीन वर्षांपूर्वी नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुयातील जातेगाव घाटात खून झाला होता. या गुन्ह्यात बोठे संशयित आरोपी असून तो सध्या कोठडीत आहे. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू आहे. आतापर्यंत फिर्यादी असलेल्या प्रत्यक्ष साक्षीदार व इन्क्केस्ट पंचनाम्यातील अन्य एका साक्षीदाराची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली गेली आहे.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर भिंगारदिवे याने छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. तो खंडपीठाने नामंजूर केला होता व सत्र न्यायालयासमोर सुनावणी दर दिवशी घेण्यासंबंधी आदेश दिले होते. दर दिवशी होणार्या सुनावणीसाठी उपस्थित राहणे शय नसल्याने सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी खटल्याचे कामकाज पाहण्यास नकार दिला आहे.दरम्यान बोठे याने एक महिन्यापूर्वी खंडपीठात जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती देशमुख यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली.