spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : त्यांच्या उतरण्याने-चढण्याने फरक पडत नाही, खा. सुजय विखे यांचा...

Ahmednagar Politics : त्यांच्या उतरण्याने-चढण्याने फरक पडत नाही, खा. सुजय विखे यांचा शरद पवारांनाच टोला

spot_img

नगर सह्याद्री / अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या एमआरआय सेंटरचे नुकतेच उदघाटन खा. सुजय विखे यांनी केले. यावेळी त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे रस्त्यावर उतरणार आहे यावर प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक टोला हाणला.

ते म्हणाले, त्यांना कुठेही उतरू द्या, त्यांच्या उतरण्याने अथवा त्यांच्या चढण्याने काही एक फरक पडणार नाही. महायुती सरकार शेतकर्‍यांशी प्रामाणिक आहे. सरकारने आतापर्यंत वेळोवेळी शेतकर्‍यांना मदतीचे निर्णय घेतले असून केंद्र सरकार पाठीशी देखील असल्याने येत्या दोन दिवसांत यातून मार्ग निघेल, असा विश्वास विखेंनी व्यक्त केला.

नगरमध्ये ते माध्यमाशी बोलताना त्यांनी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, अनेक लोकांना भास व गैरसमज होत आहेत. ते दिवसा स्वप्न पाहात आहेत. त्यामुळे त्यांनी एकदा मनपाने सुरू केलेल्या एमआरआय सेंटरमध्ये जाऊन मेंदू तपासून घेऊन ते फोटो घेऊन माझ्यासारख्या न्यूरोसर्जन डॉक्टरला दाखवावे व गैरसमज दूर करावा. वेळ पडल्यास मी त्यांचा इलाज करू शकतो व अजूनही वेळ गेलेली नाही असा सूचक तोलाच टोला खा. डॉ. विखे यांनी लगावला.

तसेच यावेळी त्यांनी नगरच्या उज्वल भविष्याविषयी देखील भाकीत केले. नगर बदलणार व चांगल्या दिशेने नेणार असून आगामी 5 वर्षात छत्रपती संभाजीनगर व नाशिक आधी नगरचे नाव असेल. त्या पद्धतीने चांगले काम आम्ही सर्व मिळून करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....