spot_img
राजकारणAhmednagar Politics : आमदार नीलेश लंके यांबाबत आरोग्यमंत्री सावंत यांचे मोठे वक्तव्य,...

Ahmednagar Politics : आमदार नीलेश लंके यांबाबत आरोग्यमंत्री सावंत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले..

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री :
पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे गावात आरोग्याची सेवा उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची  गरज आहे. या गोरगरीब जनतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात यावे अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाभुळवाडे गाव व परिसर मोठ्या लोकवस्तीचा आहे. तसेच ठाकर वस्ती, आदिवासी वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. बाभुळवाडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास याचा फायदा परिसरातील वाडी वस्तीवर होईल. त्यामुळे तातडीने आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार लंके यांनी केली. या पाठपुराव्याबद्दल  बाभुळवाडे ग्रामस्थ व शिवतेज मंडळाचे पदाधिकारी व संस्थापक ॲड. कृष्णाकांत जगदाळे, मंडळाचे अध्यक्ष दिलीप बोरुडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

आरोग्य क्षेत्रात योगदान
आमदार नीलेश लंके यांचे आरोग्य आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. कोरोना काळात नगर, पुणे जिल्ह्यातील हजारो रुग्णांना आरोग्याची सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली. लंके यांची मागणी रास्त असून लवकरच बाभुळवाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी दिली जाईल. – आरोग्यमंत्री तानाजी सावंत 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...