spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : दिवाळी फराळ नेत्यांच, नांदी विरोधकांच्या एकत्रीकरणाची, 'अहमदनगर'चे राजकारण तापलंय

Ahmednagar Politics : दिवाळी फराळ नेत्यांच, नांदी विरोधकांच्या एकत्रीकरणाची, ‘अहमदनगर’चे राजकारण तापलंय

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री :
अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण आता बदलत चाललेले दिसून येत आहे. बदलत्या कालानुरूप राजकीय निष्ठा, पक्षाचे काम आदी गोष्टी मागे पडल्यासारख्या वाटू राहिल्या आहेत.

याच कारण म्हणजे नुकतेच झालेले जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांचे दिवाळी फराळ ! हे दिवाळी फराळ होते की, विरोधकांच्या एकत्रीकरणाची नांदी होती हे अद्याप समजू शकले नाही. या फराळाचं विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेते मंडळी एकत्र येताना दिसले.

 आमदार राम शिंदे व आ. लंके यांचे एकत्रीकरण
भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी व अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांनी आपापल्या गावात दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. परंतु या दोन्ही दिग्गजांच्या फ़राळाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. तस पाहिलं तर हे महायुतीमध्ये आज असे तरी पूर्वीचे ते राजकीय वैरी. परंतु दोघेही विखे विरोधक असल्याने एकत्र आले.

एकमेकांच्या फराळाला जात दोघांनी एकमेकांचे तोंड भरून कौतुक केले. मी व लंके एकत्र आल्याचा काय अर्थ काढायचा तो काढावा, परंतु मला लंके यांचे काम आवडले, मी फार प्रभावीत झालो आहे असे म्हणत आ. शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली. दोघांची राजकीय मैत्री वेगळ्या वळणावर आल्याची जाणीव जिल्ह्याला झाली व पुन्हा एकदा विखेंविरोधात हे दोघे लोकसभेला काम करतील असे भाकीत वर्तवण्यास सुरवात झाली.

 कर्डिलेंच्या दिवाळी फराळात विखे जगतापांची चर्चा
माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या दिवाळी फराळात मंत्री विखे, खासदार विखे, माजी आमदार अरुण जगताप यांची मंदियाळी होती. परंतु यावेळी मंत्री विखे व जगताप यांच्या एकत्र बसून गप्पा रंगल्या व हीच गोष्ट चर्चेचा विषय झाली. सध्या महायुतीचे कारण जरी असले तरी मागील वेळी ते विखे विरोधात जगताप अशीच लढत झालेली होती.

त्यामुळे येथेही पुन्हा आगामी आमदारकी व खासदारकीची भाकिते बांधली गेली. विशेष म्हणजे आमदार शिंदे यांच्या फराळाला खासदार विखे व अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी एकत्रच हजेरी लावल्याने नेमकी राजकीय गणिते काय सुरु आहेत हे कुणालाच समजत नव्हते. एकीकडे शहर भाजप जगतापांना विरोध करते दुसरीकडे जगताप- विखे एकत्र फिरतात असे राजकारण सध्या दिसत आहे.

आ. रोहित पवारांची राजकीय गुगली
राम शिंदे-निलेश लंके हे आमदार एकत्र आले पण आ. रोहित पवार याना मात्र ते खटकल्याचे दिसते. राम शिंदे-निलेश लंके एकत्र येणे हे आ. रोहित पवार यांना देखील रुचले नाही हे त्यांनी टाकलेल्या राजकीय गुगलीवरून लक्षात येते.

त्यांनी पारनेरमध्ये सूत्र हलवत भाऊबीजेला पारनेरमध्ये हजेरी लावली. आमदार लंके यांच्यापासून दुरावलेले माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना एकत्र घेत तेथे पाठबळ दिले. त्यामुळे पुन्हा एकदा विजय औटी पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी चर्चा सुरु झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...