अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यात अजित पवार यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी मोठी खेळी सुरु केली आहे. आता त्यांनी उद्धव ठाकरे याना धक्का देत त्यांचा एक शिलेदार गळाला लावला आहे.
ठाकरे गटाचे अकोले तालुकाप्रमुख डॉक्टर मनोज मोरे यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवारांच्या मुंबई स्थित देवगिरी बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या पुढाकाराने धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटात प्रवेश केला. अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, आमदार किरण लहामटे हे यावेळी उपस्थित होते.