spot_img
राजकारणAhmednagar Politicas : आम्ही छोटी माणसं, आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय...

Ahmednagar Politicas : आम्ही छोटी माणसं, आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय राहणार नाही ! आ. राम शिंदे यांचा कुणाला इशारा ? पहा..

spot_img

श्रीरामपूर / नगर सह्याद्री :
Ahmednagar Political News : मी प्रामाणिक आहे. त्यामुळे मला पाच वर्षे पालकमंत्रीपद व आता पुन्हा आमदारकी मिळाली ती देखील सहा वर्षांसाठी.

जिल्ह्याच्या बाहेरील शक्ती जिल्ह्यात आणून मला पाडले, पडलो की पाडलं? ते माहीत नाही. मात्र तेव्हा सर्वांनी मजा पाहिली. आता आम्ही मजा पाहू. आम्ही छोटी माणसं असल्याने स्वतः कुणाच्या नादाला लागत नाही. पण आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय राहणार नाही असं आ. प्रा. राम शिंदे यांनी म्हटले आहे. आता त्यांचा रोख कुणाकडे होता यावरून चर्चाना उधाण आले आहे.

ते श्रीरामपूर येथे आले असता ते बोलत होते. याच वेळी त्यांनी अहमदनगर दक्षिण मधून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले. आपण सत्तेत असताना एक आणि सत्तेत नसताना एक असे बोटचेपे धोरण कधीच घेतले नाही.

सत्य बोलणे आणि वागणे हेच आपले भांडवल आहे.प्रामाणिकपणे सेवा करणार्‍याचे नशीब कोणीच हिराऊन घेऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदांसाठी आपलं नाव पुढे असते. विधान परिषदेसाठी अनेक दिग्गज रांगेत असतानाही आपल्या निवडीने केलेले प्रामाणिक कार्य आणि विश्वास सिद्ध केला असेही ते म्हणाले.

जिल्हा विभाजनाबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्हा विभाजनावर आपण आजही ठाम आहोत. जिल्हा विभाजन झाल्यातच जमा असून लवकरच ते होईल असे म्हणाले. परंतु या प्रश्नावर श्रीरामपूरचे पुढारी गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान यावेळी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीवर तुमचा निरोप मी वरपर्यंत पोहोचवतो असे आ. शिंदे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...