spot_img
ब्रेकिंगAhmednagar: ऑनलाईन व्हेरिफीकेशन झाले,आता तुम्हाला..; फे्रंचायसीच्या नांवावर सहा लाखाला गंडा

Ahmednagar: ऑनलाईन व्हेरिफीकेशन झाले,आता तुम्हाला..; फे्रंचायसीच्या नांवावर सहा लाखाला गंडा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

केएफसी रेस्टॉरंटची फे्रंचायसी देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी नगर शहरातील एका डॉटर महिलेची पाच लाख ८० हजार ५०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना ३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान घडली असून या प्रकरणी बुधवारी (दि. ८) सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सावेडी उपनगरातील डॉटर महिलेने फिर्याद दिली आहे. ३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान फिर्यादी यांच्या मोबाईल नंबरवर तीन वेगवेगळ्या मोबाईलवरून सायबर चोरट्यांनी वेळोवेळी संपर्क केला. केएफसी रेस्टॉरंटची फे्रंचायसी देतो, म्हणून विश्वास संपादन केला. फे्रंचायसीसाठी ऑनलाईन सेटेलाईट व्हेरिफीकेशन झाले आहे, आता तुम्हाला एनओसी लिअर झाल्यावर तुमचे लोकेशन फायनल होईल, अशा वेगवेगळ्या बतावण्या करून फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन पाच लाख ८० हजार ५०० रूपये बँक खात्यात भरून घेतले. केएफसी रेस्टॉरंटची फे्रंचायसी न देता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉटर महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...