अहमदनगर / नगर सह्याद्री : आईला धार्मिक कार्यक्रमस्थळी सोडून परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघत झाला.
यात जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार (18 वर्षीय) तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना बीड- अहमदनगर महामार्गावरील कडा परिसरात घडली असून वैभव उर्फ महेश नागेश होळकर असं मृताचे नाव आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे धार्मिक कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमासाठी मयत महेश होळकर हा रात्रीच्या सुमारास आईला दुचाकीवर घेऊन गेला होता.
आईला तिथे सोडून तो परत घराकडे निघाला असता कडा परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने कडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.