अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर येथील पुणे बसस्थानकावरून महिलेचे दागिने लांबण्याची घटना घडली. रुपाली रवींद्र देशपांडे असे या महिलेचे नाव आहे.
त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले ३.५ तोळयाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरटयांनी गर्दीचा फायदा घेत चोरून नेले. रुपाली देशपांडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बहिण लता दीपक देव (रा. केडगाव) पतीसोबत राहते. माझ्या मामेभावाच्या मुलाचे जळगाव येथे लग्न असल्याने मी, माझी बहिण व तीचे पती असे लग्न सोहळ्याला गेलो.
तेथून आल्यानंतर ७ डिसेंबर रोजी केडगाव येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ८ डिसेंबरला बहिण लता ही मला सोडायला पुणे बसस्थानकावर आली. त्यावेळी मी माझ्याकडील ३.५ तोळयाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र पर्समध्ये ठेवले. ती पर्स हातातील मोठ्या पर्समध्ये ठेवले. परंतु ज्यावेळी बस आली तेव्हा खूप गर्दी झाली.
त्या गर्दीतून मागे आल्यावर मला समजले की माझ्या पर्समधून ८७५०० रुपयांचे दागिने गायब झाले होते. अधिक तपास पोलीस करत आहेत.



