spot_img
अहमदनगरAhmednagar News : नगर शहरात गोवंशीय जनावरांची खुलेआम कत्तल? पोलिसांची मोठी करवाई,...

Ahmednagar News : नगर शहरात गोवंशीय जनावरांची खुलेआम कत्तल? पोलिसांची मोठी करवाई, ‘इतकी’ जनावरे सोडली

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : शहरातील झेंडीगेत परिसरातून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली.

नविद रफिक कुरेशी व अन्नू रफिक कुरेशी (दोन्ही रा.सुभेदार गल्ली,झेंडीगेट) हे दोन आरोपी कारवाईदरम्यान फरार झाले. पोलसांनी यावेळी तीन बैल, दोन गोर्हे व एका गाईची मुक्तता केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी : पोसई तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नविद रफिक कुरेशी व अन्नू रफिक कुरेशी यांनी कुरेशी मश्जिद मागे झेंडीगेट येथे गोवंशीय जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले आहेत. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना घटनास्थळी मुद्देमाल व आरोपी आढळले. परंतु पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपी पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता ६० हजार रुपये किमतीचे ३ बैल, एक गाय व २० हजार किमतीचे २ गोर्हे आढळून आले. पोलिसांनी त्यांची सुटका केली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...